अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर भाजप नेत्यांच्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता रहावी व पुढील अनर्थ घडू नये म्हणून अमळनेर शहरात आमदार शिरीष चौधरी , आमदार स्मिता वाघ व माजी आमदार डॉ बी एस पाटील यांच्या घरावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून दोन दोन पोलीस प्रत्येकाच्या घरावर तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सावधानता बाळगून बंदोबस्त लावल्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी सांगितले.दरम्यान डॉ पाटील परिवार उपचारासाठी धुळ्यात असूनही घराजवळ अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात आहेत.