अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात मागील एक दोन महिन्या अगोदर ओम टी दुकानावर जाऊन बळजबरीने सिगारेट पाकीट व तंबाखू असे १०८० रुपयांचे साहित्य लुटून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले असून त्यात एक अल्पवयीन आहे.
२५ फेब्रुवारी रोजी तीन तरुण अर्बन बँकेसमोरील ओम टी दुकानावर गेले आणि सिगारेट , तंबाखू , बिडी बंडल असे १०८० रुपयांचे साहित्य घेतल्यानंतर दुकानदाराने पैसे मागितले असता सराईत गुन्हेगार राकेश चव्हाण चा अल्पवयीन मुलाच्या भ्रमणध्वनीवर कॉल आला व दुकानदाराला दमबाजी केली तेव्हा त्या मुलांसोबत अविनाश मंगल ढिवरे व बबलू मेहमूद बागवान हे तरुण होते त्यांनी पैसे न देता निघून गेले होते पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व पोलीस नाईक किशोर पाटील यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला १२ रोजी रात्री त्यांच्या घरून त्यांना अटक करण्यात आली तपास सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत.