अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे भाजपच्या युतीच्या स्टेजवर नेत्यांना खाली उतरवा आणि त्यांचा रोष डॉ बी एस पाटील यांच्यावर होता त्यातच मारहाणीचा आखाडा झाला होता. या मारहाणीत उदय वाघ व समर्थकांकडून मारहाण झालेले भाजप चे माजी आमदार डॉ बी एस पाटील धुळ्यात सिद्धेश्वर रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल झाले आहेत.
बी एस पाटील यांच्या नाकाचे हाड मोडले आणि लिव्हरला सूज आली आहे. बुधवारी सायंकाळी भाजपच्या महायुतीच्या मेळाव्यात दोन मंत्र्यांसमक्ष भर मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या ६ कार्यकर्त्यांनी डॉ पाटील यांना जबर मारहाण केल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांना जबर मार लागलेला आढळून आल्याने त्यांना रात्रीच तातडीने धुळे येथील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे डॉ पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या नाकात रक्ताच्या गुठळ्या व नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे तर पोटाला मार बसल्याने पोटाच्या लिव्हरला सूज आल्याचे व छातीला मुक्का मार लागल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती त्यांचे शालक डॉ चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
तसेच भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ , शहराध्यक्ष शीतल देशममुख , राजेश वाघ , पंकज पवार , संदीप वाघ , देवा लांडगे , ऐयाज बागवान यांना पोलिसांनी रात्रीच अटक करून लगेच जामिनावर सोडण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.