मा.आमदार गुलाबराव पाटलांसह उदय वाघांची शस्रे “म्यान”….

अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच अमळनेर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हत्यारांचे परवाने असणाऱ्या सर्वांना आपली हत्यारे जमा करण्याचा आदेश बजावला होता. प्रत्येक निवडणुकीत अशा स्वरुपाचा आदेश पोलिसांकडून काढला जातो. बहुतांश वेळा या आदेशाची पोलिसांकडून सक्तीने अंमलबजावणी केली जाते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय तोफा धडाडणार असल्या तरी नेत्यांना स्वसंरक्षणासाठी दिलेली शस्त्रे मात्र, नियमानुसार काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी जप्त केले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील व तालुक्यातील राजकीय व्यक्तींसह इतर ३० जणांचे
नेत्यांसह, शस्त्र परवाना असलेल्या परंतु गुन्हे दाखल असलेल्या व्यक्ती तसेच, निवडणुकीच्या काळात शस्त्र बाळगण्याची गरज नाही, अशा जवळपास ३० परवानाधारक शस्त्रधारकांना निवडणूक काळात ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व कायदा सुव्यवस्था अबाधित राखीत निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याच्या हेतूने पोलिसांकडे शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.
त्यात प्रामुख्याने माजी आमदार गुलाबराव पाटील , भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ , ऍड ललिता शाम पाटील , यांचे व बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल अंबर पाटील यांचे निधन झाल्याने व इतर असे ३० जणांचे हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत. सुवर्ण व्यापारी , तसेच बँक सुरक्षा कर्मचारी माजी सैनिक आदींचे हत्यार मात्र आवश्यक सुरक्षेसाठी त्यांच्याजवळच ठेवण्यात आले आहेत
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये पोलिसांकडे जमा केलेले शस्त्रे पुन्हा संबंधित शस्त्रधारकांना मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *