अमळनेर(प्रतिनिधी) माझे आजपर्यंतचे निवडणुकीचे सर्व अंदाज खरे ठरले आहेत,यंदा जनतेनेच मोदींना पून्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा निश्चय केला असल्यांने जळगाव लोकसभेत महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील हे पाच लाखांचे मताधिक्य घेऊन विजयी होतील हा आपला दावा असून असा अचूक दावा आम्ही केवळ जनतेत राहतो यामुळेच करू शकतो असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन यांनी अमळनेर येथे महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी केले.तर सहकार राज्यमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी साडेचार वर्ष आम्ही अपमान सहन करून देखील केवळ मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही महायुतीच्या छताखाली एकत्रित आलो असल्याचा खुलासा केला.
अमळनेरातील प्रताप मिल गोडाऊनच्या मैदानावर पार पडलेल्या या मेळाव्यास कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळाला मात्र भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आ डॉ बी एस पाटील यांना मंचावर मारहाण केल्याची व गिरीश महाजन यांना धक्काबुक्की केल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने मेळाव्यास गालबोट लागले. यावेळी मंचावर ना गिरीश महाजन,ना गुलाबराव पाटील,महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील,सेनचे संपर्क प्रमुख संजय सावंत,आ स्मिता वाघ,आ शिरीष चौधरी,भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ,सेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,डॉ बी एस पाटील,नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील,जि प अध्यक्षा सौ उज्वला पाटील,रिपाई चे अनिल खरात,संघटन मंत्री किशोर काळकर उपस्थित होते.पुढे बोलताना ना महाजन म्हणाले की प्रत्येक गोष्टीला प्रारब्ध लागत,त्याशिवाय काही मिळत नाही,उदय वाघ आणि स्मिता ताईंना पक्षाने भरपूर काही दिले,जि प अध्यक्ष,महिला प्रदेशाध्यक्ष,उदय वाघांना जिल्हाध्यक्ष तसेच आमदारकी साठी मीच स्मिता ताईंचे नाव देखील सुचविले.आता लोकसभेची उमेदवारी देखील दिली होती,परंतु निष्कर्ष आणि चाचणीमुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली मात्र त्यांना आजपर्यंत जे मिळालं ती पक्षाचीच देणं आहे,पार्टीशी एकनिष्ठ राहील तर सार काही मिळत,अजूनही अनेक वर्षांपासून कार्यकर्ते काम करीत असून त्यांना ग्राम पंचायत सदस्य पदसह काहिही मिळालेलं नाही,याच वाईट वाटत,खरेतर परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे,आज देशासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे,आ. उन्मेष पाटलांचा जसनसंपर्क चांगला असून त्यांच्यासाठी आणि मोदींसाठी आपल्याला मते मागायची आहेत,आज देशाची परिस्थिती तुमच्या समोर असून अनेक संकटांवर मात करत देश पुढे चालला आहे,ही निवडणूक रस्ता,पाणी,धरण,यासाठी नसून देशाच्या सुरक्षेसाठी आहे,यामुळे सर्व मतभेद विसरून देशाला प्राधान्य देऊन ही महायुती झाली आहे.काँगेस राष्ट्रवादीची अवस्था सर्वजण पाहत असून मोदीशिवाय देशाला पर्याय नाही.काँगेस कडे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे निश्चित नाही.यासाठी या देशाला जगज्जेता करण्यासाठी आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सज्ज व्हा असे जाहीर आवाहन त्यांनी केले.
पाकिस्तान झुकविणारे एकमेव मोदी – ना.गुलाबराव पाटील

भाजपाशी आमची युती असताना गेल्या साडेचार वर्षात अनेक अन्याय झाले,मात्र मोदींसाठी आणि देशासाठी आम्ही सर्व विसरून एकत्र आलो आहोत,कारण राज्य आणि जिल्ह्यात काहीही होवो परंतु पाकिस्थान ला झुकविणारा एकच मर्द असून ते म्हणजे नरेंद्र मोदी आहेत,यामुळे पाठीशी आम्ही ठामपणे उभे झालो आहोत,जनतेला देशद्रोही कायदा रद्द करणारे सरकार हवे की वीर अभिनंदन ला सुरक्षित देशात आणणारे सरकार हवे याचा विचार जनतेने करायचा आहे,विरोधी काँग्रेस ५६ लोकांचं सरकार बनविण्याचे स्वप्न दाखवीत असल्याचा आरोप करीत देशासाठी उन्मेष दादांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.व उदय वाघांना उद्देशून म्हणाले की प्रारब्द असल्याशिवाय काहीही मिळत नाही मंत्रिपदासाठी अनेकदा माझे नाव येऊन हुलकावणी मिळाली तरी मी संयम सोडला नाही,हा वाद बसून चर्चा करून सुटू शकला असता,असे सांगून हे दरवाजे बंद झाले असले तरी पुढचे उघडतील असा सल्ला त्यांनी शेवटी वाघ यांना दिला.
उन्मेष पाटील उमेदवार नसून मोदींचा सैनिक – आ उन्मेष पाटील

आ. उन्मेष पाटील जळगाव लोकसभेचा उमेदवार नसून नरेंद्र मोदींचा एक सैनिक तुमचा उमेदवार आहे,तसेच ही निवडणूक तुमच्या आमच्या अस्मितेची नसून त्यांच्या अंतर्मनात देशभक्ती आहे,त्या नरेंद्र मोदींच्या अस्मितेची असून त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा सेना महायुतीचे उमेदवार आ उन्मेष पाटील यांनी केले.पुढे बोलताना ते म्हणाले की ही वेळ आपसातील रुसवे फुगवे काढण्याची नसून राष्ट्रासाठी योगदान देण्याची आहे,यामुळे वेळेचे महत्व लक्षात घेऊन वाटचाल करावी ,पाडळसरे धरण समितीने ना महजन याना धारणाबाबत निवेदन दिले असून त्यांनी धारणास गती देण्याचे वचन समितीला दिले आहे,परंतु यासाठी सत्तेची गरज असून आज प्रत्येकाशी संवाद साधण्याची इच्छा असली तरी वेळेअभावी शक्य नाही अमळनेर तालुक्याचा मी जावई असून संधी दिल्यास विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,जळगाव लोकसभेचा खासदार आदर्श ठरेल अशी ग्वाही आ पाटील यांनी दिली.
यावेळी दोन काँगेस कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करण्यात आले.मंचावर सेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.सभा यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जिवन पाटील,प स सदस्य भिकेष पाटील,माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील,खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल,माजी शहराध्यक्ष लालचंद सैनांनी,शहराध्यख शितल देशमुख,तालुका सरचिटणीस हिरालाल पाटील,यासह असंख्य कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले तर सुत्रसंचालसन शरद सोनवणे यांनी केले.