खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

शिवाजी उद्यानात होम हवनाने झाला योग शिबिराचा समारोप ; उद्यानात नित्य योग कक्ष होणार सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील शिवाजी उद्यानात पतंजली योग पीठ व योग प्रचारक प्रकल्प तर्फे आयोजित निशुल्क पाच दिवशीय योग प्राणायाम शिबिराचा समारोप होम हवन करून करण्यात आला. तसेच उद्यानात नित्य योग कक्ष सुरू करण्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप ने हे शिबिर आयोजित केले होते.
प्राणायाम,आरोग्य,व जडी बुटी शिबिराचे मार्गदर्शक तथा पतंजलीचे जळगाव जिल्हा योग प्रचारक कमलेश आर्य (हरिव्दार) अमळनेर यांनी शिवाजी उद्यानात संपूर्ण पाच दिवस पहाटे 5.30 ते 7.30 दरम्यान योग व प्राणायामाचे प्रशिक्षण देऊन आरोग्य व जडीबुटी विषयी अनमोल मार्गदर्शन केले.या शिबिरास महिला व पुरुषांचा उत्तम प्रतिसाद लाभला.अखेरच्या दिवशी योग शिबिराचा समारोप करतांना हवण करण्यात आला. आरोग्यप्राप्तीसाठी अनेकांनी याचा लाभ घेतला.तसेच उद्यानात नित्य योग कक्षा सुरू करण्याचा मानस ग्रुप सदस्यांनी व्यक्त केल्याने कमलेशजी आर्य यांच्या मार्गदर्शनाने सिद्धार्थ सोनवणे यांनी प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली,यामुळे याठिकाणी नित्य योग वर्ग सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले.या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनेकांनी शिवाजी गार्डन ग्रुपचे विशेष कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button