खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अमळनेरातील शिवाजी उद्यानात शनिवारी रंगणार “पाडवा पहाट”कार्यक्रम

श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचा उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर शहरात विविध उपक्रमा मुळे अत्यंत प्रसिद्धीझोतात असलेला श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि 6 एप्रिल रोजी गुढी पाडव्याला पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
शनिवार दि 6 एप्रिल रोजी पहाटे 5.30 ते 7.30 यावेळेत श्री शिवाजी उद्यान,न्यू प्लॉट,अमळनेर येथे हा कार्यक्रम होणार आहे.यावेळी अमळनेर येथील प्रसिद्ध शहनाई वादक श्री संजय जी गुरव व सध्यस्थीतीत सुमधुर आवाजामुळे अत्यंत प्रसिद्धी झोतात असलेला,सुरेख गायनाने काळजाचा ठेका चुकविणारा उत्कृष्ठ गायक श्री देवर्षी गुरव यांचा सुप्रसिद्ध ग्रुप मराठी व हिंदी भावगीत,भक्ती गीत यासह विविध रोमांचक गीते सादर करून पहाटेच्या गारव्यात सुखद असा आनंद देणार आहेत.यावेळी प्रमुख उपस्थिती प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा ललित मोमाया व सौ स्नेहल ताई मोमाया यांची लाभणार असून त्यांच्या शुभहस्ते गुढी पूजन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण होऊन कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. तरी या संस्कृतीक कार्यक्रमाचा तमाम अमळनेर वासीयांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप, अमळनेर तसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना अमळनेर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button