
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील फाफोरे हिंगोणे दरम्यान के टी वेअर बंधाऱ्याच्या बांधकाम ठिकाणी शासकीय कामांसाठी वाळू लागते या नावाखाली साठे करून वाळू इतरत्र विकून आर्थिक कमाई अधिकच केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने मंगळवारी रात्री धडक कारवाई करत ५०० ब्रास वाळू साठा जप्त केला आहे.
या शासकीय बंधाऱ्याच्या कामावर अमळनेर तहसीलदार व तलाठी,कोतवाल पथकाने मंगळवारी सायंकाळी तपासणी केली असता प्रथमदर्शनी ५०० ब्रास वाळू अवैध साठा आढळून आला आहे. त्या वाळूचा पंचनामा करण्यात आलेला असून संबंधित बांधकाम ठेकेदार किरण गोसावी व पंकज चौधरी या दोघांना नोटीस बजावली आहे.
याबाबत सदर वाळूचा पंचनामा करून तहसिलदार ज्योती देवरे यांनी नोटीस बजावत पाच पट दंड का आकारण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस देत कारवाई केली आहे.