नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावले ; घर कोसळल्याने महिला बाल बाल बचावले.!

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील आशाबाई नारायण चौधरी ह्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाक घरात जेवण बनविताना अचानक मातीचे घर कोसळल्याने जखमी झाल्या आहेत.
काल सायंकाळी सात वाजता आशाबाई नेहमीप्रमाणे स्वयमपाक बनवीत होत्या. त्यावेळी अचानक घराचे धाबे कोसळले असता एकच मोठा आवाज झाला.
चौधरी यांनी आरडा ओरड केली.मुलगा योगेश हा कंबरेपर्यंत अडकल्याने त्याला काढण्यात आले. मात्र आशाबाई त्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याने सुरुवातीला मातीच्या धुरामुळे काहीही दिसत नव्हते मात्र लोकांनी ताबड़तोब माती बाजूला करीत आशाबाई यांना बाहेर काढण्यात आले.
यावेळी आशाबाई यांचे नशीब बलवत्तर असल्याने त्या या मोठ्या अपघातातुन बचावल्या आहेत. दरम्यान माहिती मिळाल्याने मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश शेंबळे तलाठी एस बी बोरसे यांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *