अनुदान देण्यासाठी एक लाख रुपये मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) आर.टी.ई.कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाचे अनुदान देण्यासाठी एक लाख रुपये मागणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षणाधिकारी सह इतर अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जवखेडा येथील इंग्रजी शाळेच्या अध्यक्षांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिव वंदना कृष्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
जवखेडा येथील अभिनय युवा संस्था अंतर्गत जवखेडा येथे दत्त गुरू इंग्लिश मेडिअम स्कूल व म्हसले येथील आबाजी मोहन पाटील पब्लिक स्कूल अशा शासनमान्य शाळा सुरू असून दरवर्षी आर टी ई कायद्यानुसार २५ टक्के प्रवेश नियमानुसार मोफत केले जात असून १ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार शाळेने सर्व बाबींची पूर्तता केली असून अनुदान मिळण्यासाठी किमान ३० ते ३५ वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील , शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील , उपशिक्षणाधिकारी देवांग , वरिष्ठ साह्ययक संदीप पाटील यांची भेट घेऊन अनुदान वितरित करण्याची मागणी केली परंतु त्यांनी बोलतो करतो असेच सांगितले म्हणून २६ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेडारम्यान गणेश नागो लिंगायत , दिनेश पाटील यांच्यासोबत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या कार्यालयात जाऊन २५ % प्रवेशाच्या अनुदानाची रक्कम मागितली असता शिक्षणाधिकारी पाटील यांनी तुझे काम फुकट होणार नाही मला एक लाख रुपये द्या तुमची १०० टक्के रक्कम काढून देतो असे सांगितले आणि मुख्यकार्यकारी अधिकारी व त्यांचे स्वीय साह्ययक या दोघांना पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही असे सांगितले त्यांनतर संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी वरिष्ठांशी चर्चा केली तरी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व त्यांच्यासोबत हेतुपुरस्कर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि सखोल चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी भटू पाटील यांनी शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई च्या अवर सचिवांकडे केली आहे तसेच त्यांनी वारंवार अनुदान मागणीसाठी केलेला प्रवास , कार्यालयातील सी सी टी व्ही फुटेज हे चौकशी दरम्यान उपलब्ध होईल असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *