महसूल मंत्र्याची जिल्ह्यात शिस्त ; वरीष्ठ अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त ; महसूल विभागातील गौण खनिज बंदी पथक सुस्त ; महसूल अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर लक्ष ; वाळू तस्करांची रात्री गस्त ; बांधकाम व्यावसायिक मस्त ; आम जनता त्रस्त…..
■ अमळनेरात वाळू तस्करी वाढली,भर दिवसा होते वाळू वाहतूक ; वाळू चे ठेके गेलेले नसतांना संबंधित अधिकाऱ्यांच्या उघड्या डोळ्यांना वाळू दिसेना, महसुल विभागाचे सफशेल दुर्लक्ष.
■ अमळनेर प्रांत व तहसिलदार हे मोठमोठ्या बांधकामाच्या जागी अवैध वाळू ढिगाऱ्यांचे पंचनामे करतील का…?
■ धुळेरस्त्यावरील सरकारी रस्त्यांच्या ठिकठिकाणी लहान (मोऱ्या)पुल बांधकामासाठी लागणारा अवैध वाळू साठा..
■ ट्रॅक्टर सह छोटे टेम्पो गाडींचा सुळसुळाट
■ मुरूमच्या टेकड्या दिवसा पोखरल्या जात असतांना संबंधित अधिकारी व तलाठी मुग गिळून गप्प.
अमळनेर( खबरीलाल ऑनलाईन ) अमळनेर तालुक्यात मध्यराञी व पहाटेच्या सुमारास मोठ्याप्रमाणात वाळूची तस्करी केली जात आहे. सुमारे एक ते दोन लाख रुपयाचा दंड ठोठावला जात असतांनाही वाळू तस्करी करण्याची हिंमत केली जात आहे.
यावरुन महसुल विभागातील काही कर्मचाऱ्यांशी रेतीतस्करांचे साटेलोटे असल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.
अमळनेर शहरासह तालुक्यात बांधकाम वेगाने सुरु असल्याने रेतीची मागणी वाढली आहे.त्यामुळे बेभावपणे व्यावसायीक रेती खरेदी करीत आहे.याचा गैरफायदा रेती तस्कर घेत आहे. राञभर रेती तस्करी चालत असतांना महसुल विभागाच्या आशिर्वादाने की डोळेझाकीमुळे तस्करांची हिंमत वाढली आहे. रेतीचे लिलाव झाले नसतांनाही बांधकामावर मोठमोठे रेतीचे ढिगारे दिसुन येत आहेत. बांधकाम व्यावसायीकांकाडे राँयल्टी नसल्यास संबंधित बांधकाम व्यवसायीकांवरही दंड ठोठावण्याची तरतुद आहे.माञ महसुल विभागाचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसुन येत आहेत.
अमळनेर तालुकास्थळी प्रांत,तहसिलदार, मंडळधिकारी, तलाठी यांच्यासह महसुलविभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत.दस्तुरखुद्द अमळनेरात वाळूची तस्करी होत असतांना यासर्व कर्मचारीवर्गाचे होत असलेले दुर्लक्ष हा संशोधनाचा विषय ठरला आहे.