
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे काल दुपारी साडेतीन च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत ८७ क्विंटल कापूससह चारा शेती अवजारे आगीत जळून खाक झाले.
भिलाली गावाच्या पश्चिम भागात आगीने पेट घेतला हवा सुरू असल्याने आगीचा रोख गावाकडे होता.
यावेळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती, घरातील माठ, व गवहाळ मधील पाणी नागरिक आणून आगीवर टाकत होते, यावेळी तरूणांनी मोठ्या प्रमाणावर हिम्मत दाखवून खळ्यातील गुरे ढोरे सोडून जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी याबाबत माहिती मिळताच अमळनेरचे २, शिंदखेडा येथिल 1 बंब व एकलहरे येथील खाजगी टँकर च्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले होते, घटनास्थळी मारवडचे व परिसरातील शहापूर, एकलहरे एकतास,बेटावद, येथील पाण्याचे टँकर तातडीने पोहचले
तालुक्यातील ही तिसरी घटना असून याआधी रणाईचे, पिंगळवाडे, आणि आता भिलाली येथे आग लागली आगीचे कारण मात्र समजू शकले नाही यात एकूण ८७ क्विंटल कापूस, ५०० पाईप, पत्राशेड, शेती अवजारे आदीचे नुकसान, सुमारे १८ शेतकऱ्यांचे लाखो लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज, तहसीलदार ज्योती देवरे यांनी भेट देत नुकसानीची पाहणी केली.यात खळवाडीला लागलेल्या आगीत ५ खळे , २ घरे जळून खाक झाली आग हळूहळू गावाकडे सरकत होती. शेतकऱ्यांचे पत्रा, शेती अवजारे , चारा, सागवान लाकूड , बैलगाडी , ५०० पाईप , ठिबक नळ्या, पाण्याचे मशीन , शेणखत , घराचा इमला , असे साहित्य जळून खाक झाले या आगीत गुलाब नाटू पाटील ८ लाख , भगवान न्हावी दीड लाख , मधुकर पाटील ६ लाख , निंबा पाटील ३ लाख , कैलास पाटील ३५ लाख , दगा पाटील २० लाख , भिवसन माळी १ लाख , गुलाब शामराव पाटील २ लाख , नाना नागो पाटील २ लाख , भिका पाटील ४ लाख , देविदास पाटील २ लाख , समाधान पाटील दीड लाख , दगडू माळी दीड लाख , पावभा पाटील १ लाख , गुलाबराव भिल ८० हजार , सुखदेव भिल ७० हजार असे एकूण ८८ लाख ५० हजाराचे नुकसान झाले.
घटनास्थळी मारवड सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील,इतर कर्मचारी उपस्थित होते.