विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे मास्तर जेलमध्ये

अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रशिक्षणाच्या वेळी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या वावडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर लोकप्रतिनिधींत्व कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
३१ रोजी सानेगुरुजी विद्यालयाच्या खोली क्रमांक १ ते १९ मध्ये लोकसभा निवडणुकीचे इ व्ही एम आणि व्ही व्ही पॅट चे प्रशिक्षण सुरू होते त्यावेळी वावडे येथील बी बी ठाकरे माध्यमिक विद्यालयाच्या राजू रतन पारधी व कल्पेश ज्ञानेश्वर गुजर यांना खोली क्र १९ मध्ये प्रशिक्षण असताना प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार ज्योती देवरे हे कक्षात गेले असता दोन्ही शिक्षक आढळून आले नाही त्यावेळी ते खोली क्रमांक १८ मध्ये गोंधळ घालताना आढळून आले अधिकारी त्यांच्या जवळ गेले असता त्यांच्या तोंडातुन दारूचा वास येत होता त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी नायब तहसीलदार अजबसिंग जयवंत वळवी यांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वळवी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध लोकप्रतिनिधींत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाययक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत दोघं शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.