सहा विभागासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली थेट नियुक्ती

अमळनेर-वेस्टर्न रेल्वेच्या झोनल रेल्वे युसर्स काँस्युलेटिव्ह कमिटी (झेडआरयूसीसी)क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्षदात्री समिती या कमिटीवर अमळनेर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रितपालसिंग राजेंद्रसिंग बग्गा यांची कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.थेट रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे पत्र बग्गा यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.खा ए टी पाटील यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती झाली आहे.
चर्च गेट मुंबई येथील झोनल हेडक्वार्टर्स कार्यालयांतर्गत रेल्वे मंत्र्यांनी ही नियुक्ती केली आहे. रेल्वेच्या सहा विभागांतर्गत ही नियुक्ती असून यात वडोदरा,राजकोट,अहमदाबाद,रतलाम,भावनगर व मुंबई आदी विभागांचा समावेश आहे.यानुसार बग्गा यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान व मध्यप्रदेश आदी चार राज्यांतर्गत असणार आहे.या कमिटीची दर तीन महिन्यांनी बैठक होत असते,यात रेल्वे अंतर्गत महत्वपूर्ण प्रश्न मांडण्याची संधी मिळत असते.व ही बैठक रेल्वेचे जनरल मॅनेजर (जी एम) डीआरएम,अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत होते.यात नवीन रेल्वे गाडी सुरू करणे,महत्वपूर्ण स्थानकावर गाड्याना थांबा देणे, प्रवाश्यांची सुरक्षा व गाडीचे वेळापत्रक आदीबाबत सूचना अथवा मागणी या बैठकीत करता येऊ शकते ,विशेष म्हणजे या बैठकीतील मागण्या शक्यतोवर मान्य होत असतात.
तसेच झेड आरयूसीसी मेंबर या नात्याने बग्गा यांना वेस्टर्न रेल्वे अंतर्गत कोणत्याही गाडीची तपासणी अथवा पाहणी करणे,रेल्वे स्थानकातील स्वच्छता व फूड स्टॉल ची पाहणी करणे तसेच रेल्वे गाडी मधील पेंट्रीकार सर्व्हिस व मालाची क्वालिटी आदी तपासण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.सदरचे अधिकार लक्षात घेता प्रितपाल बग्गा यांची रेल्वेच्या अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या झोनल कमिटीवर नियुक्ती झाली असून अमळनेर शहरास एक मोठा बहुमान त्यांच्या रूपाने प्राप्त झाला आहे.सदर नियुक्तीबद्दल त्यांचे खा ए टी नाना पाटील,आ शिरीष चौधरी,आ सौ स्मिता वाघ,माजी आ डॉ बी एस पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ,जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील,हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी व नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील यांनी विशेष अभिनंदन केले असून बग्गा यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या पदाच्या माध्यमातून अमळनेर रेल्वे स्थानकाचा शॉर्टकट रस्ता दूरदर्शन टॉवर पासून काढून अमळनेर कारांची विशेष सोय करण्याचा तसेच विद्यार्थी व प्रवाश्यांसाठी नंदुरबार ते पुणा लोणावळा नविन रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा मानस बग्गा यांनी व्यक्त केला आहे.