
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील अल्पसंख्याक विकास व हक्क फाउडेशन अमळनेर तफेॅ व्हाईट बिल्डिंग मधील शाळा हलवविण्या बाबत पालिका मूख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील पालिका ऊर्दू शाळा क्र 11 ही साईड क्र 71 लक्ष्मी टाॅकीज गांधलीपूरा अमळनेर येथे स्थलांतर करावी याचबरोबर पालिका ऊर्दू शाळा क्र 11 ही अनेक वर्षापासून खासगी जागा व्हाईट इमारतीत येथे भरत आहे ही शाळा स्थापना झाल्यापासून येथे कूठलीही मूलभूत सूविधा नाही ही इमारत पडकी व जीर्ण अवस्थेत आहे. येथील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे याशिवाय खेळण्यासाठी प्ले ग्राऊंड नाही शौचालय नाही चारही बाजूने वाहतूकी चे रस्ते आहेत व पावसाळ्यात शाळेचे छत गळते जवळच काही अंतरावर अंतरावर विज वीतरण कंपनीचे भले मोठे ट्रांन्सर्फामर आहे अश्या अनेक समस्यांनी अल्पसंख्याक विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक झूंजत आहे तरी यांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून म्हणून पालिका प्रशानाला निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी अल्पसंख्यांक विकास व हक्क फौंडेशनचे तालूका अध्यक्ष अज़हर अली सैय्यद, शहर अध्यक्ष ज़ूबेर पठाण सून्नी दार्ऊल कज़ा चे अध्यक्ष फय्याज़ पठाण, नगरसेवक सलीम टोपी, नगरसेवक शेखा हाजी, जेष्ठ नेते हाजी सत्तार मास्टर, माजी नगरसेवक फिरोज मिस्तरी, ईम्रान खाटीक, सामाजिक कार्यकर्ते संतोश भाऊ लोहेरे, अलतमश शेख, मूशीर शेख, अहेमद मिस्तरी व पालक व्यवस्थापन समीतीचे पदधिकारी ही उपस्थीत होते.