
अमळनेर (प्रतिनिधी )येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्नित राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी, अमळनेर येथील श्रीनाथ रवींद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांनी ही नियुक्ती।केली असून जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुत्ती पत्र देण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार रुजविण्यासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन समस्यांना वाचा फोडण्यासाठी पक्षाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवुन पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. श्रीनाथ पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता असून ग्रामीण भागात व शहरी भागात त्यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे ,या सर्व बाबी बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल भाईदास पाटील आणि अमळनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन पाटील व व सर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी श्रीनाथ पाटील यांचे एकमेव नाव पक्षश्रेष्ठींकडे दिले होते .अखेर श्रीनाथ पाटील यांचेच नाव निश्चिय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल भाईदास पाटील,संचालक,सौ तिलोत्तमा पाटील, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार काटे, कार्याध्यक्ष विनोद कदम ,देविदास देसले, युवक शहराध्यक्ष बाळू पाटील, युवक तालुकाध्यक्ष हर्षल पाटील देसले शहराध्यक्ष विद्यार्थी शहराध्यक्ष सुनील पाटील गणेश पाटील सचिन पाटील सुनील शिंपी, सनी गायकवाड आदींनी अभिनंदन केले.