
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात दोन गटात मागील पूर्व वैमानस्यावरून वाद होऊन परस्पर विरोधी दोघांच्या कपाळावर तलवार हल्ला करून जखमी केल्याची घटना २९ रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली.
ताडेपुरा येथील बबिता भरत फतरोड यांनी फिर्याद दिली की २९ रोजी संध्याकाळी ७ वाजता घराजवळ दिर राजू मुनिर फतरोड यांना राजू कन्हैय्या घोगले , रवी राजू घोगले , विकी घोगले , प्रेम घोगले यांनी शिवीगाळ करणे सुरू करून देख लेंगे म्हणत दम दिला गर्दी गोळा झाली म्हणून समजवायला गेली असता राजू घोगले ने हातातील तलवारीने डाव्या दंडावर मारून दुखापत केली आणि ब्लाऊज फाडून विनयभंग केला तसेच रवी घोगले याने हातातील दगड कपाळावर मारून जखमी केले
यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला चारही आरोपींविरुद्ध भादवी 354 अ प्रमाणे विनयभंग , 324 , 336 , 504 , 506, 34 व शस्र कायदा 4 / 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.
तर दुसऱ्या गटातर्फे आशाबाई घोगले रा गांधलीपुरा यांनी फिर्याद दिली की २९ रोजी दिर राजू घोगले हे सती माता मंदिराकडून दर्शन घेऊन घरी परतत असताना ताडेपुरा येथे राजू मुनिर फतरोड याने रस्ता अडवून तू इधर कैसे घुम रहा , मैने मर्डर किया हुवा है असे म्हणून दमदाटी शिवीगाळ करणे सुरू केले असता त्यावेळी राजू घोगले याने मुझे क्यो रोखा असा जाब विचारला असता आकाश फतरोड व ठाकूर फतरोड हे धावत आले त्यावेळी आकाशने हातातील तलवारीने राजू घोगले याच्या कपाळावर मारून दुखापत केली व ठाकूर ने लोखंडी पाईप ने मारून दुखापत केली यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला भादवी 326 , 341 , 504 , 506 ,34 व शस्र कायदा 4 / 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाययक फौजदार सुभाष साळुंखे करीत आहेत.