लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करीत शहरातील काही पोलिस स्टेशन्सच्या हद्दीत आज शनिवारी पोलिसांनी संचलन केले.
निवडणूक काळात शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत याची सर्वाधिक जबाबदारी पोलिसांवर आहे. म्हणूनच पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. निवडणुकीपूर्वी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, अनुचित प्रकारांना प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन करण्यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र ससाणे यांच्या मार्गदर्शनाने रुट मार्च काढण्यात आला. उपविभागाच्या हद्दीतील अमळनेर,मारवड,पारोळा, एरंडोल, या पोलिस ठाण्याअंतर्गत एकूण ५० पोलिस व RCP चे २० कर्मचारी व ८ अधिकारी पोलिस उपविभागीय राजेंद्र ससाणे, प्रभारी अधिकारी आर. सी. पी.चे RSI मगन चव्हाण,पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, एरंडोल पोलिस निरीक्षक हजारे, हर्षल कुलकर्णी, पारोळा कानडे, मारवड समाधान पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक सदगीर, PSI चंद्रकांत चातुरे, राज्य राखीव सुरक्षा बलाच्या २० जवानांची तुकडी या संचलनामध्ये सहभागी झाले. शस्त्रधारी पोलिसांच्या संचालनातून पोलिस निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचा संदेश नागरिकांना देण्यात आला.