३ म्हशी गंभीर जखमी , पिंगळवाड्यालाही आगीत घर जळाले
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे अचानक दोन खळ्याना आग लागून ३ म्हशी गंभीर जखमी होऊन सुमारे सहा लाख रुपये किमतीचा संपूर्ण चारा व शेती अवजारे असा ६ लाखाचा ऐवज जळल्याची घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील रणाईचे येथे घडली तसेच पिंगलवाडे येथे ही घर जळून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
रणाईचे येथील दिलीप अजबराव पाटील तसेच आधार राघो पाटील यांच्या खल्याला सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली चाऱ्याने तात्काळ पेट घेतल्याने चाहुबाजुने आगीचे लोळ उठले खळ्यात म्हशी बांधलेल्या असल्याने त्या ओरडू लागल्या आरडाओरड सुरू होताच गावकरी गोळा झाले मिळेल त्या साधनाने पाणी मारणे सुरू केले मात्र उष्णतेची लाट जबरदस्त असल्याने जवळ उभे राहणे अवघड झाले होते त्याचवेळी रणाईचे हुन जानव्याला पिण्याचे पाण्याचे टँकर नेणाऱ्या चालकाला दुरून आग दिसली तो २ किमी अंतरावरून मागे फिरला आणि टँकर मधील आहे तेव्हढ्या पाण्याने आग विझवण्याचे प्रयत्न केले.
परंतु तरीही आग आटोक्यात येत नव्हती तो पर्यंत नगरपालिकेचे दोन बंब मागवण्यात आले अग्निशमन प्रमुख नितीन खैरनार , फारुख शेख , जाफर खान , मच्छिन्नद्र चौधरी , दिनेश बिऱ्हाडे , भिका संदानशीव ,रफिक खान , आकाश बाविस्कर यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले विझवण्यासाठी सुमारे दोन तास लागले आगीत दिलीप पाटील यांनाच तीन लाखाचा २ ट्रक चारा व एक लाखाचे शेती अवजारे जळून खाक झाले तर आधार राघो पाटील यांचे २ लाखाचे नुकसान झालयाचे गावकऱ्यांनी सांगीतले गावकऱ्यांनी कसे बसे तीन म्हशी खळ्यातून बाहेर काढल्या म्हशी गंभीर जखमी झाल्या होत्या परंतु अमलनेरचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही बी भोई , अमलगावचे एस बी रामोळ , एम एस पाटील (पारोळा ), पी ए पाटील (जानवे) यांनी वेळीच म्हशींवर उपचार केल्याने म्हशींचे प्राण वाचले तलाठी बाविस्कर यांनी पंचनामा केला तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पारा ४२ अंशावर गेला असल्याने उष्णतेच्या लाटेमुळेच आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच तालुक्यातील पिंगलवाडे येथे २८ रोजी रात्री साडे अकरा वाजता धक्का लागल्याने गौतम दगा पारधी यांच्या घराला आग लागल्याने कपडे , व वस्तूंसह संपूर्ण घर जळून खाक झाल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले अमळनेर नगरपरिषदेच्या बंबाने आग विझवली.