अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात अनेक महत्वपूर्ण तपासण्या मोफत करण्यात आल्या. एकूण ५ हजार किमती असणाऱ्या या सर्व तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात आल्याने रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेत समाधान व्यक्त केले. या शिबिरात डॉ. पंकज संतोष महाजन, डॉ. मयूर संतोष महाजन यांच्यासह गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअरची संपूर्ण टीम उपस्थित होती. त्यांनी प्रत्येक रुग्णाला काळजीपूर्वक व सन्मानपूर्वक सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जपली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.