अमळनेर(प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण करण्यात आले.
माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक बांधिलकी जपत अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, ही जबाबदारी म्हणूनच हा उपक्रम हाती घेतला आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी केले. या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच महिलामंडळ मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहाने उपस्थित झाले होते.