अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयेश कोळी हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांची निवड होताच समर्थकांनी जल्लोष केला.
कोळी यांना लोकनियुक्त सरपंच इंजी. गिरीश पाटील यांचे सहकार्य लाभले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच इंजी.गिरीश सोनजी पाटील हे होते. मागील उपसरपंच विकास बोरसे यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर जागा रिक्त झाली होती. या वेळी पंचायतीचे सदस्य माधुरी पाटील, सुनिता पाटील, शितल वाल्हे, सोनाली कुंभार, सुनंदा चौधरी, संध्या चावरे, हिंमत पारधी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीतून पुन्हा एकदा लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.