अमळनेर (प्रतिनिधी) के. डी. गायकवाड माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात पालक सभा झाली. विद्यार्थी यांनी मोबाईल पासून दूर राहून अभ्यासाकडे कसे लक्ष द्यावे तसेच पालकाच्या समस्याचे निराकरण मुख्याध्यापक यांनी केले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर होते. पालक सभेत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष ए. व्ही. नेतकर तर उपाध्यक्ष पालकमधून सिताराम महादू बोरसे यांची निवड करण्यात आली. तसेच विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एम. आर. सोनवणे, डि. एस. पाटील व पी. आर. पारधी यांनी सभेला सभोदन केले. सभेचे प्रास्ताविक पालक सभेचे सचिव जे.एस. पाटील यांनी केले.