अमळनेर (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल शहराध्यक्षपदी अरुण इच्छाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी ही नियुक्ती केली आहे. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिनेश शेलकर उपस्थित होते. अरुण पाटील हे आमदार अनिल पाटील यांचे कट्टर समर्थक असून गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकीय, सामाजिक वर्तुळात सक्रिय आहेत. या नियुक्ती बद्दल त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज गार्डन गृप, राजे शिवाजी मित्र मंडळ, जी.एस. गृप, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, संजय चौधरी, चेतन राजपूत, जीवन पवार, शरद पाटील, प्रमोद वाघ, विनोद कदम, भटू पाटील, अलिम मुजावर, ईम्रान खाटीक, विक्रांत पाटील यांनी स्वागत केले आहे.