अमळनेर (प्रतिनिधी) भाजपातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी “महा रक्तदान शिबिर’ घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अमळनेर शहर मंडल, जानवे मंडल व पातोंडे मंडल येथे एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यात आले.
हा उपक्रम खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला. प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा भैरवी वाघ, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, प्रदेश पदाधिकारी हरचंद लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर शहर मंडल, जानवे मंडल व पातोंडे मंडल येथे एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यात आले. या शिबिरांमध्ये रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.
विशेषत: युवकांनी आणि पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत समाजाप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, सरचिटणीस भरतसिंह परदेशी, देविदास लांडगे, माजी नगरसेवक पांडुरंग महाजन, विजय राजपूत, उमेश वाल्हे, भारती सोनवणे, राकेश पाटील, उपाध्यक्ष श्याम पाटील, कैलास भावसार, प्रीतपाल सिंग बग्गा, रमेश धनगर, दिलीप ठाकूर, राम भैय्या कलोसे, शिवा महाजन, विष्णू सैनानी,पिंटू चौधरी, दीपक भोई,बापू पाटील, श्याम भावसार,अनिल लाड,रवी ठाकूर, सचिन साळुंखे, संभाजी पाटील, पाटील,महेश पाटील,युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील,स्वप्निल चौधरी, भूषण सूर्यवंशी, निलेश पाटील, कल्पेश पाटील,भूषण महाजन, अक्षय चव्हाण, उज्वल मोरे, शुभम मोरे व रक्तदाते पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.