मंगरूळ येथील माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा  विषयावर मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय येथे सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील अस्मिता पाटील, श्वेता चौधरी यांनी आपल्या सकाळच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे कशाप्रकारे घडतात. त्यापासून आपण कसे वाचावे, जसे की ओ.टी.पी. फ्रॉड, ए.पी.के. फाईल फ्रॉड, कोणत्याही लिंकला क्लिक करण्याआधी ती लिंक सुरक्षित आहे का ? यासाठी लिंकचा प्रोटोकॉल https असा असावा एस. असेल तरच त्या लिंकला क्लिक करावे. त्यांनतर नोकरीसाठी होणारे फ्रॉड, खोटे इमेल मेसेज या गोष्टींपासून आपण कशाप्रकारे सावध रहावे ह्या गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले. आणि आपल्यासोबत एखादा सायबर फ्रॉड झाल्यास cybercrime.gov.in या पोर्टल ला त्वरित आपली तक्रार नोंदवावी. नंतर 1930 या हेल्पलाइनवर कॉल करून सायबर पोलिसला तक्रार सांगावी. यावेळी शाळेचे मुख्यध्यापक प्रकाश पाटील शिक्षक, प्रभुदास पाटील तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यात शिक्षक समन्वयक राजू आमले तसेच क्विक हील फाउंडेशन पुणे येथील साक्षी पाटील, गायत्री केसकर, दिपू सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *