अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील राॅयल उर्दू हायस्कूल व अल-फहला ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या सत्काराने विद्यार्थी भारावून गेले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी केबिनेट मंत्री व अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील होते. ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मतदारसंघातील दहा गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार आहेत. हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने गरिबीच्या परिस्थितीतून आलेले असावेत आणि त्यांना खरोखरच शिक्षणाची ओढ असावी. ते पुढे म्हणाले, “मुस्लिम समाजातील पाच विद्यार्थ्यांची नावे निवडून मला देण्यात यावीत, जे या निकषांना पात्र ठरतात.” तसेच, “आजच्या युगात शिक्षण हे सर्वात मोठं हत्यार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी पुढे यावं,” असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार अनिल पाटील, व मुंबईहून आलेले प्रा. अखलाख, सत्तार मास्टर, हाजी शेखा मिस्त्री, नरेंद्र संदानशिव, भागवत पाटील, हाजी शब्बीर पहलवान, इम्रान खाटीक, मोना शेख, ताहा बोहरी, मुख्तार खाटीक, महंमद साबीर, इम्रान शेख, डॉ. रईस बागवान, आबिद सैय्यद, पत्रकार मुन्ना शेख, अशफाक शेख,शराफत ठेकेदार, मुबारका सैय्यद, खालिद शेख,सईद तेली, जाकिर पठाण, जुनैद शेख, अजहर अली, जुबेर पठाण, सैय्यद नबी, यांच्या सर्व मान्यवरांचे सत्कार आयोजकांकडून करण्यात आले.
शहरातील हिरा इंग्लिश स्कूल, राॅयल हायस्कूल, नॅशनल स्कूल, अल-फैज गर्ल्स हायस्कूल येथील मुस्लिम समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आमदार व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे, दोन विधवा महिलांना शिलाई मशिन देऊन मदतीचा हात देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहेतेशाम खान यांनी प्रस्ताविक व शाळेची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अखलाख शेख, इक्बाल शेख, फारुख सुरभी, तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अस्लम काझी यांनी केले.