अमळनेर (प्रतिनिधी) पी. बी .ए .इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी दिक्षिता भामरे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कुमारी दिक्षिता अजय भामरे ही शहरी विभागातून सातव्या अनुक्रमांकाने उत्तीर्ण झाली असून, राज्यातून समस्त पाचवीच्या गटातून तिने २२५ वा अनुक्रमांक प्राप्त केला आहे. ती इयत्ता सहावीसाठी शिष्यवृत्तीधारक ठरली आहे.
तिने आपल्या ऐतिहासिक कामगिरीच्या माध्यमातून शाळेच्या उज्वल यशस्वी परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. या शिष्यवृत्ती धारकाचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक, जे .एस. देवरे यांच्या हस्ते करण्यात आला .या यशस्वी विद्यार्थिनीस मार्गदर्शन , विषयानुसार प्रबोधन, शाळेच्या शिक्षिका व्ही.एस. अमृतकर, सुवर्णा भावसार, स्वाती माळी, डिंपल देसाई, यांनी केले. ती अजय भामरे यांची कन्या असून याबद्दल सर्व स्तरावरून तिचे कौतुक होत आहे.