अमळनेर (प्रतिनिधी) केळीच्या पिकावर तणनाशक मारल्याने जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील निम येथे घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निम येथील चंपालाल हिरामण पाटील (वय ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ललित गोकुळ राठोड (रा. निम) हा शेताच्या बांधावर तणनाशक मारत असताना त्याने फिर्यादीच्या शेतातील केळीच्या पिकावर तणनाशक मारून नुकसान केले. याचा जाब फिर्यादीने विचारला असता ललित याने शिवीगाळ केली. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ. संजय पाटील हे करीत आहेत.