न्यू. प्लॉट परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर विकास मंचच्या फलकाचे अनावरण

अमळनेर (प्रतिनिधी) येथील न्यू. प्लॉट परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या न्यू. प्लॉट परिसर विकास मंचच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या मंच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्य आणि परिसराचा विकासावर काम करण्यात येणार आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ या फलकाचे अनावरण अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उद्योजक दिपचंद अग्रवाल व शेतकरी संघटनेच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष जयश्री प्रकाशसिंग पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सामाजिक व सांस्कृतिक कार्य आणि परिसराचा विकास या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते न्यू प्लॉट परिसर विकास मंचची स्थापना करण्यात आली होती. चेतन राजपूत हे मंचचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांच्या सह परिसरातील मान्यवरांच्या संकल्पनेतून हा मंच स्थापन झाला आहे. आज स्थितीला या मंचचे सुमारे 300 पेक्षा अधिक सदस्य आहेत. मंचच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान नूतनीकरणसह परिसरात रस्ते काँक्रीटीकरण, शितलनाथ चौकचे निर्माण, नवीन पथदिवे अशी अनेक विकासकामे झाली असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीही मंचचा नेहमीच पुढाकार राहत असतो. याव्यतिरिक्त अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्य देखील पार पडत असतात. मंचच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून अतिशय मोठा नवरात्र उत्सव छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात साजरा होत असून याठिकाणी न्यू प्लॉटसह परिसरातील सर्व महिला व पुरुष एकत्र येत असल्याने शहरातील सर्वाधिक मोठा नवरात्र उत्सव म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक एकात्मतेचे प्रतिक म्हणूनही हा उत्सव मानला जात असतो. न्यू प्लॉट विकास मंचच्या अंतर्गत न्यू प्लॉट महिला मंचची देखील निर्मिती झाली असून यातही मोठया प्रमाणात महिलांचा समावेश आहे. फलक अनावरण प्रसंगी सर्व मान्यवरांनी विकास मंचच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी अध्यक्ष चेतन राजपूत तसेच अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा, व्हा. चेअरमन रणजित शिंदे, संचालक पंडित चौधरी, अमळनेर तेली समाजाचे अध्यक्ष संजय चौधरी, उद्योजक गोविंद अग्रवाल, भास्कर बोरसे, भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन,राजू देशमुख,पिंटू राजपूत, ॲड.  दीपेन परमार, ॲड. निनाद पाटील, राजुसिंग परदेशी, बॉबी सोनार, दीपक बारी,किरण पाटील, सोमचंद संदानशिव, बाबूलाल पाटील, रणजित पाटील, मनोज पाटील, युवराज पाटील, अरविंद चव्हाण, खेमचंद कटारिया तसेच मंचचे पदाधिकारी बिपिन पाटील, महेंद्र पाटील, डॉ. संजय शाह, डॉ. संदीप सराफ, प्रविण पारेख, प्रतीक कोराणी, महेश राजपूत यासह सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *