अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी, आर. झूणझूवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने २० जुलै रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मंगळग्रह मंदिर परिसरात सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान आयोजित या शिबिरात गरजूंची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीअंती निवड झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठविले जाणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी आपल्या सोबत आधार कार्ड व रेशन कार्डाच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात. रक्त पातळ करण्यासाठीच्या किंवा मधूमेहाच्या (डायबेटीस) गोळ्या चालू असतील तर त्या गोळ्या आणि डॉक्टरांची फाईल सोबत आणावेत. शिबीराला येतांना उपाशीपोटी येणे. (चहा व नाश्ता घेवू नये). तुम्ही जर ऑपरेशनसाठी सिलेक्ट झालात तर सोबत टिफिन आणि पांघरून सोबत ठेवणे. त्याच दिवशी तुमची पनवेल येथे जाण्याची मोफत व्यवस्था केली जाईल. हॉस्पिटलमध्ये जेवणाची सोय राहील. कुटूंबातील कोणत्याही एकाचा मोबाईल नंबर सोबत ठेवावा. डोळ्यासंदर्भातील गंभीर समस्या व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्यांनीही यावे. गरजूंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.