अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे झालेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील आर्यन हितेश पाटील याने इंग्रजी माध्यमाच्या तालुका गुणवत्ता यादीत तृतीय स्थान पटकावले आहे. आर्यन पाटील हा वाघोदे गावाचे माजी सरपंच डॉ. विजय छबिलाल पाटील यांचा नातू असून साने गुरुजी विद्या मंदिरचे लिपीक हितेश पाटील यांचा मुलगा आहे. आर्यन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.