अमळनेर (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे ममता विद्यालयात राजयोग मेडीटेशन कार्यक्रम घेण्यात आला. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र दिव्यांग समानता, संरक्षण आणि सक्षमीकरण मोहिमे अंतर्गत ममता विद्यालयात राजयोग मेडिटेशन कार्यक्रम घेण्यात आला. माऊंट अबू (राजस्थान) येथील सुर्यमनी भाई महूआ दीदी यांनी दिव्यांग मुलांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी करुन घेतल्या.
अमळनेर शाखेच्या विद्या दीदी, आरती दीदी आदिनी सहकार्य केले. मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी आभार मानले. कल्पना ठाकुर, वैशाली राऊळ, सोनाली पवार, हेरंब कुळकर्णी, शांतीलाल पाटील, नामदेव जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.