अमळनेर (प्रतिनिधी) इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन ज्ञानेश जोशी तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील विद्यार्थी अर्जुन ज्ञानेश जोशी हा अमळनेर तालुक्यातील सर्व उत्तीर्ण व शिष्यवृत्ती धारक, इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांकाने व जळगाव जिल्ह्यात 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
शाळेच्या प्राचार्या सिस्टर स्मिता अँथोनी व शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर डिवाइन व सर्व शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले. प्रताप महाविद्यालयातील निवृत्त प्रा. डॉ. पी. जे. जोशी व प्रा. डी. एस. लोहार यांचा नातू आणि उद्योजक ज्ञानेश जोशी व अर्जुन बायोलॉजी क्लासेसच्या संचालिका सोनल जोशी यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.