अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेचे माजी कर्मचारी तथा जामनेर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक विजय सपकाळे यांचेवर अतिक्रमण काढतांना झालेल्या जीवघेणा हल्लाचा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद,नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेतर्फे निषेध करून हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यासंदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की जामनेर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक विजय सपकाळे दि.17 रोजी दुपारी जामनेर शहरातील विना परवाना फेरीवाले गांधी चौकात बसलेले असल्यामुळे अतिक्रमण विरोधी पथक त्या ठिकाणी रहदारी मोकळी करण्यास गेले असता दिपक पंढरी भोई नामक अतिक्रमण धारकांने पथकातील प्रमुख आरोग्य निरीक्षक सपकाळे यांना शिवीगाळ करून हातगाडीस लावलेल्या छत्रीच्या लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली असून अश्या हल्लेखोरावर भारतीय न्याय संस्थेच्या योग्य त्या कलमाखाली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सोमचंद संदानशिव, सचिव संतोष बिऱ्हाडे,किरण कंडारे, डिगंबर वाघ,आर. डी. लंबोळे, महेश जोशी,सुनिल पाटील, सुदर्शन शामनानी, कुणाल महाले,कुणाल कोष्टी, आर. डी. चव्हाण, डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर उपस्थित होते.