आढावा घेण्यासाठी खासदारांनी दिले पालिकेला बैठकीचे आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने खासदार स्मिता वाघांना नगरपरिषदेने केलेल्या मालमत्ता कराच्या वाढीसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावर खासदार वाघ यांनी मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देत आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नासंदर्भात झालेली सर्वपक्षीय सहविचार सभा आणि पालिकेत झालेली बैठक याबाबत सविस्तर माहिती देऊन सर्वेक्षणासाठी खाजगी संस्थेला दिलेला ठेका, लोकवर्गणी, पाणीपट्टीवर लावलेली २ टक्के शास्ती,मालमत्ता हस्तांतरण वर आकारली जाणारी २ टक्के रक्कम याबाबत सविस्तर माहिती दिली. यावर खासदार वाघ यांनी मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देत आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, पांडुरंग पाटील, संजय पाटील,किरण पाटील,महेंद्र रामोशे, जितेंद्र ठाकूर, बाबूलाल पाटील, आर. जे. पाटील यासह राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.