लोकसभा निवडणुकीत रा.कॉ.काँग्रेस चा पी.आर. पी.प्रचार करणार नाही – महामंत्री जगन सोनवणे

अमळनेर( प्रतिनिधी) जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात पीपल्स रिप्ब्लिकन पार्टी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा प्रचार करणार नसल्याचे पी आर पी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी अमळनेर येथे विविध संघटना भीमगर्जना मेळाव्यात व पत्रकार परिषदेत सांगितले.
सोनवणे म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून प्रत्येक निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ने काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रचार केला आहे मात्र भुसावळ विधानसभेची उमेदवारी देताना जळगावचे व बाहेरचे तसेच संजय सावकारे सारखे दलबदलु उमेदवार दिले जातात ते नंतर कधीही पक्षाचा प्रचार करीत नाहीत त्यामुळे भुसावळची जागा सोनवणे यांना देण्याचे लेखी वचन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी न दिल्यास जिल्हयातील दोन्ही मतदारसंघात पी आर पी प्रचार करणार नाही असा इशारा दिला यावेळी रमाई ब्रिगेड संघटनेच्या पुष्पाताई सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले यावेळी तालुकाध्यक्ष सुभाष आगळे , महिलाध्यक्षा सुनंदा पांनपाटील, वैशाली ससाणे , दुर्गेश पवार , ऍड शिवकुमार ससाणे , सुधाकर बिऱ्हाडे , उदीलाल संदनशिव, भीमराव बिऱ्हाडे , रावसाहेब पवार , शरद ससाणे , किरण वानखेडे , संतोष संदानशीव , राजू कार्लेकर , पारोळा तालुका प्रमुख सुधाकर सैंदाने हजर होते.
पी आर पी ने जळगाव जिल्हयात कामगार मेळावा व बैठक आयोजित केल्या आहेत 4 एप्रिल दु 2 वाजता जळगाव पत्रकार भवन , 5 रोजी पाचोरा दुपारी 2 वाजता खत कारखाना येथे राष्ट्रीय पेंटर मजदूर सेनेचा मेळावा , 7 रोजी चाळीसगाव येथे पी आर पी च्या जनसंपर्क कार्यालयात ,7 रोजी दु 2 वाजता पाळधी धरणगाव चा समाजमंदिरात कार्यकर्ता मेळावा , 16 रोजी आंबेडकर मैदान भुसावळ येथे सायंकाळी 6 वा बहुजन एकटा मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे तालुकाध्यक्ष सुभाष आगळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *