गंभीर गुन्हे करणाऱ्या तरुणाला केले सहा महिने जिल्ह्यातून हद्दपार

अमळनेर (प्रतिनिधी) पिस्टलने गोळीबार करून लूटमार, दरोडा , मोटरसायकल अडवून लूटसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील पैलाड भागातील तरुणाला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

पैलाड भागातील रहिवाशी सागर संजय पाटील (वय २५) यांच्यावर पिस्टलने गोळीबार करून लूटमार, दरोडा , मोटरसायकल अडवून लूट, जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा दमदाटी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापासून सामान्य नागरिकाला धोका असल्याने पोलिस निरीक्षक यांनी त्याला मुंबई पोलीस कायदा अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(अ)(ब) प्रमाणे हद्दपार करण्याचा प्रस्ताव डीवायएसपी यांच्याकडे पाठवला होता. त्यावर डीवायएसपी यांनी साक्षीदार तपासून प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सागर याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *