अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये पुण येथील महात्मा गांधी राजभाषा हिंदी परीक्षेत १५५ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व मार्गदर्शक संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. शाळेच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आल्या. साने गुरुजी कन्या हायस्कूल गेल्या पंचवीस वर्षापासून परीक्षेची तयारी व मार्गदर्शन करीत आहे. हिंदी विषय शिक्षक दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. परीक्षा यशस्वी करण्यासाठी मुकेश पाटील व दीपक महाजन यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सर्व ज्येष्ठ संचालकांनी कौतुक केले.