अमळनेर (प्रतिनिधी) स्वतंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी (रहें) स्टडी सेंटर अॅण्ड पब्लिक लायब्ररी, तथा सुन्नी दारूल कजा अमळनेर यांच्या वतीने हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था यांच्या सर्व पद अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी शब्बीर अली सैय्यद होते. नवनियुक्त अध्यक्ष मोना शेख, उपाध्यक्ष सैय्यद नबी,व जुबेर पठाण, सचिव: अजहर अली, सहसचिव अशफाक शेख, खजिनदार आरिफ मेमन, सदस्य शब्बीर पहलवान, जाकिर शेख पहलवान, जाकिर शेख यांचा सत्कार अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अॅण्ड पब्लिक लायब्ररीचे अध्यक्ष रियाज मौलाना व त्यांच्या संचालक मंडळतर्फे करण्यात आला.
कार्यक्रमावेळी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल लतीफ शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हाजी ताहेर शेख, कमरोदीन शेख, युसुफ पेंटर, अमजद अली शाह, नविद शेख, जाविद पेंटर, जमालुद्दीन शेख, सैय्यद अहमद अली, शकील शेख, युवा नेते सामाजिक कार्यकर्ता मनोज मोरे, मुश्ताक बागवान, फारुक खाटीक, सिकंदर पेंटर, मुन्ना बेलदार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर राजू शेख यांनी हीं आपले मनोगते व्यक्त केले. यानंतर हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेचे सचिव अजहर अली सैय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेची सविस्तार माहिती दिली. सुन्नी दारुल कजा व पब्लिक लाइब्रेरी आणि स्टडी सेंटरचे अध्यक्ष मौलाना रियाज शेख यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन मसुद पठान कुरेशी यांनी केले. आभार हाजी ताहेर शेख यांनी मानले.
ऑक्टोबर महिन्यात सामुहिक विवाह सोहळा
हसनैन करीमैन वेलफेयर हे मुस्लिम समाजाचे अमळनेर येथे सामुहिक विवाह करणारी ही पहली संस्था आहे. सामाजिक बाधिंलकी जोपसणारी संस्था आहे. 2017 पासून ते 2024 पर्यंत यांनी गोर गरीब गरजु मुस्लिम 50 जोडप्यांचे काही न घेता लग्न लाउन दिले आणि त्यांच्या संसारात लागनारे भांडे (बर्तन) पलंग पिडी कपड़े गॅस कपाट आदी वस्तु भेट दिले. आता 2025 मध्ये ऑक्टोबर महिन्यात 11 सामुहिक विवाह करणार आहे.