राज्य सरकारच्या निर्णया विरोधात अमळनेर तालुका होमिओपॅथिक असोसिऐशनतर्फे निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) बीएचएमएस डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यास राज्य सरकारने मज्जाव केल्याने या निर्णयाला विरोध करण्यासाठी अमळनेर तालुका होमिओपॅथिक असोसिऐशनतर्फे प्रांतधिकाऱ्यांना सोमवारी प्रांताधिकारी निवेदन देण्यात आले.

प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारला इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सदर निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे होमिओपॅथिक असोसिऐशनचे म्हणने आहे.

९ जानेवारी २०१४ रोजी तत्कालीन राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी ऍलोपॅथी औषध वापरण्याची परवानगी दिली होती. २४ जुन २०१४ रोजी विधीमंडळात बहुमताने दोन्हीही सभागृहाने यासाठी मान्यता दिली. यानंतर राज्यपालाने स्वाक्षरी केल्यानंतर हा कायदा लागू झाला. या कायदयादवारे होमिओपॅथी डॉक्टरांना बीएचएमएस हा साडेपाच वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर व प्रॅक्टीसची १० ते १५ वर्षे पूर्ण केल्यानंतर एमबीबीएस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स करणे अनिवार्य करण्यात आले होते. 

दरम्यान राज्य शासनाने १५ जुलैपासुन सीसीएमपी रजिस्ट्रेशन सुरु केले नाही तर महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती मुंबई तील आझाद मैदानात १६ जुलैपासुन आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी अमळनेर तालुका होमिओपॅथिक असोसिऐशन सदस्य डॉ. डी. एम. पाटील, डॉ. देवयानी बडगुजर, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. परेश पाटील, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. योगेश नेतकर, डॉ. निलेश पाटील, डॉ. मिलिंद पाटील यासह इतर डॉक्टर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *