साने गुरुजी विद्यालयातील एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत यश

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत यश मिळवले असून त्यांचे कौतुक केले जात आहे.

अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये साने गुरुजी विद्यालयातील एकूण २६ विद्यार्थी एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट झाले होते. तरी सर्व विद्यार्थी चांगल्या श्रेणीने उत्तीर्ण झाले. त्यामध्ये २० विद्यार्थी ए श्रेणी त उत्तीर्ण झाले तर सहा विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले. तरी सदर विद्यार्थ्यांना साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर समाधान पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.  या यशा बद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे व सर्व संचालक मंडळ व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *