अमळनेर (प्रतिनिधी) येथील काटे बंधूनी मातोश्री विमलबाई प्रतापराव काटे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवशाही फाउंडेशनतर्फे गरीब- गरजू शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींना शैक्षणिक साहित्य वाटप केले.पारोळा, कोळपिंप्री, सडावण येथे कार्यक्रम घेण्यात आले.
कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच संजीव काटे होते. यावेळी वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन गिरीश काटे, माजी सरपंच दत्तात्रय काटे, शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, सुरेश काटे, भगवान काटे, जुलाल काटे, प्रमोद काटे, महेंद्र सोनवणे, प्रकाश काटे, शिवशाही फाउंडेशन चे सचिव उमेश काटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम चौधरी, प्राथमिक शिक्षक सुनिल एम. काटे व ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. उमेश काटे यांनी प्रास्ताविक केले. आत्माराम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान सडावण (ता. अमळनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज पाटील यांच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका सरला बाविस्कर, पदवीधर शिक्षक राजेंद्र पाटील, उपशिक्षक शामकांत बागड, मनीषा पाटील, मेघा सोनवणे, नितीन शिंदे, रूपाली जाधव, युवा प्रशिक्षणार्थी वर्षाराणी पाटील आदी उपस्थित होते.
पारोळा येथील उत्कर्ष प्राथमिक विद्यामंदिर येथेही शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संदीप पाटील, उपशिक्षक जयेशकुमार काटे, जितेंद्र बोरसे, राजेंद्र मराठे, अशोक गुंजाळ, शीतल पाटील,मनिषा पाटील,वैशाली चव्हाण आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.