अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रसेवा दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला भेट दिली.
पाहुण्यांचे स्वागत प्रा.अरविंद सराफ, शुभम पवार, चेतन सोनार, मिलिंद वैद्य व तरुणाई यांच्या हस्ते केले. धुळे येथील राष्ट्रसेवादल सहकारी, राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित सहकारी यांचे स्वागत रोहित पाटील, लोकेश वाणी, शिव निकम, हेमंत साळुंखे, नाविण्य पाटील, प्रथमेश चौधरी, अभय वाघमोडे, विक्रांत शेजवल, तुषार पाटील, आश्विनी वाघमोडे यांनी गुलाब फुल, पर्यावरण संरक्षण संतुलनसाठी कापडी पिशवी देऊन केले. यावेळी अजित शिंदे यांनी आतापर्यंत स्मारकावर झालेले कामकाज समजून घेत. एक वडाचे झाड लावले. या वटवृक्ष प्रमाणे आपण तरूणाईला काम करण्यासाठी सावली निर्माण करून देऊ, अशी ग्वाही दिली. प्रस्ताविक गोपाळ नेवे यांनी केले.