अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी गुरूपौर्णिमा निमित्त असंख्य युवा कार्यकर्त्यांनी भेट घेऊन वंदन करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
गुरू पौर्णिमेला आपले आईवडील, साधू संत गुरू समान मार्गदर्शक,शिक्षक आदी व्यक्तींना वंदन केले जात असते, याच अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील असंख्य युवकांनी आपले मार्गदर्शक व आधारस्तंभ आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी गर्दी करून वंदन करत शुभेच्छा दिल्यात. यावेळी आमदार पाटील यांनी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर आई वडिलांची सेवा करा, सर्व वडीलधाऱ्या मंडळींचा सन्मान राखा, आपले कुटुंब आणि आरोग्य सांभाळून मेहनत व जिद्दीने खूप मोठे आणि यशस्वी व्हा असा मौलिक सल्ला दिला.
रवि ज्वेलर्स अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1125/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट