अमळनेर (प्रतिनिधी) गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री गुरुदेव दत्त संस्थान व ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्दतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात बालरोगतज्ञ व डेंटल सर्जन यांनी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले. या शिबीरात गावातील व परिसरातील शेकडो गरुजूंनी लाभ घेतला.
श्री गुरुदेव दत्त संस्थेचे अध्यक्ष निंबा ज्याला चौधरी व ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी खुर्द प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाने दत्त मंदिर परिसरात आयोजित या शिबीरात अमळनेर येथील नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र ठाकरे, डेंटल सर्जन डॉ. श्वेता ठाकरे यांनी रुग्णांची मोफत तपासणी करुन मार्गदर्शन केले.
वेलनेस फोरएव्हर मेडिकल यांच्यामार्फत रुग्णांना गोळ्या व औषधींसाठी सहकार्य लाभले. या शिबिरात पिंपळे सह चिमनपुरी पिंपळे खु पिंपळे बुद्रुक आदी भागातील गरजूंनी लाभ घेतला. यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव दत्त संस्थान मंडळासह ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ निंबा बापू चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, पुरुषोत्तम लोटन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, गोकुळ पाटील यांनी सहकार्य केले.
रवि ज्वेलर्स अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98000/-.22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1110/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट