अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील बसस्थानकाकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमित घरे पालिकेने पाडल्यावर त्याचा मलबा या रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरित हे ढिगारे हलवण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
बसस्थानक शेजारील असलेल्या गांधीनगर भागातील ५० पेक्षा जास्त अतिक्रमित घरे पालिकेने १० मार्च रोजी पाडली. मात्र तेथील अतिक्रमणाचा तो मलबा हटवण्यापूर्वीच न्यायालयाची स्थगिती आली. न्यायालयाने जैसे थे आदेश दिल्याने पालिका प्रशासन हतबल झाले. मात्र तो अतिक्रमण केलेल्या घराचा मलबा रस्त्यावर जशाच्या तसा पडल्याने त्या भागातून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या नागरिकांना ऐन पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून जी.एस.हायस्कूल, लोकमान्य शाळा तसेच द्रौ.रा.कन्याशाळेच्या अनेक विद्यार्थिनी पायी अथवा सायकलीने प्रवास करत असतात. रस्त्याच्या एका बाजूला दगड विटांचा खच तर दुसऱ्या बाजूला मोठी उघडी गटार असल्याने अनेकदा अपघात झाल्याचे समोर आले आहे. पालिकेने यावर उपयोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मार्ग काढण्याचा प्रयत्न करु
या रस्त्यासंदर्भात कोर्टाच्या स्थगिती आदेशामुळे कुठलीही कारवाई करता येत नाही. नागरिकांची अडचण लक्षात घेता यावर लवकरच मार्ग काढण्याचा प्रयत्न करु.
तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर
रवि ज्वेलर्स अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98000/-.22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1110/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट