शहरात साचलेल्या डबक्यात ॲबेटिंग व ऑइल टाकण्यास सुरुवात
अमळनेर (प्रतिनिधी) पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू, मलेरियाची साथ पसरू नये म्हणून नगरपालिका आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डास उत्पत्ती थांबवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी डबक्यांमध्ये अॅबेटींग व ऑइल टाकणे सुरू केले आहे.
पावसाळा आला की ठिकठिकाणी डबके साचून डासांची तसेच कीटकांची उत्पत्ती वाढते. डेंग्यू , मलेरिया व इतर आजारांची साथ वाढते. नागरिकांचा त्रास रोखून त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नगरपालिका मुख्याधिकारी तुषार नेरकर आणि तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांची संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागातील खुले भूखंड, रस्त्यावरील डबके, हौद, बाहेरील ड्रम, टायर, फ्रीज आदी विविध तपासण्या करून त्यात काळे ऑइल व अॅबेट टाकून डासांची उत्पत्ती थांबवली जात आहे. तसेच विहिरी व वापराच्या पाण्याच्या साठ्यांमध्ये गप्पी मासे सोडले जात आहेत. गप्पी मासे पैदास केंद्रांना भेटी देऊन तेथील गप्पी मासे इतरत्र सोडले जात आहेत. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, डॉ. विलास महाजन, तालुका आरोग्यपर्यवेक्षक फुगे, आरोग्य निरीक्षक किशोर माळी परिश्रम घेत आहेत.
४० आशा स्वयंसेविका नियुक्त
शहरात ४० आशा स्वयंसेविका नेमून प्रत्येक प्रभागात घरोघरी डासांची उत्पत्ती रोखली जात आहे. त्यामुळे डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराचे प्रमाण वाढण्यापूर्वीच दक्षता म्हणून उपाययोजना केली जात आहे.
– डॉ विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी नगरपालिका अमळनेर
रुग्णांची माहिती कळवण्याचे निर्देश
शहरातील सर्व डॉक्टरांना एन एच १ ,आयजीएम चाचणीबाबत काही संशयास्पद वाटल्यास तातडीने रुग्णाची माहिती कळवण्याचे निर्देश दिले आहेत.
–डॉ गिरीश गोसावी , तालुका वैद्यकीय अधिकारी अमळनेर
रवि ज्वेलर्स अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98000/-.22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1110/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट