तहसील आवारात दांगडो घालणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे पोलिसांना पत्र

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान बेकायदा त्वरित बंद करण्याची मागणी करणाऱ्या तहसील आवारात गोंधळ घालणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे पत्र तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना दिले आहे.
ढेकू खु येथील रास्त भाव दुकानाबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील स्थगिती आदेश 28 नोवेंबर 2018 शासनाकडील पत्रानुसार उक्त स्वस्त धान्य दुकान बाबत मंत्रीमहोदयांनी स्थगिती दिली असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडील पत्र व पुरवठा विभागाचे सदस्य दुकान पूर्ववत करण्याबाबतचे पत्र आदेशात नमूद असल्याने सदर दुकान पूर्ववत करण्यात आलेले आहे सद्यस्थितीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अत्यंत महत्त्वाचे कामकाज सुरू असून मार्च वसुली वगैरे कामकाज सुरू असताना तहसीलदारांच्या दालनात दगाजी भाईदास पाटील यांनी अचानक प्रवेश करून मौजे ढेकू खुर्द तालुका अमळनेर येथील रास्त भाव दुकान बंद न केल्यास उपोषणाची धमकी देत बेकायदेशीररीत्या उपोषणाचा मार्ग अवलंबला यावेळी तहसीलदार देवरे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडील उपरोक्त आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे सदर बाबतीत आपण सक्षम न्यायालयात दाद मागावी अशी समज संबंधीतास दिली असताना देखील सद्यपरिस्थितीत कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चे प्रथम प्रशिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची निवडणूक ऑर्डरी व वितरण कामकाजाबाबत आचारसंहिता निवडणूक विषयी महत्त्वाचे कामकाज सुरू असल्याचे तहसीलदार यांनी आपणास समजावून सांगितले तरीही ऐकल्यामुळे बेकायदा आवारात बेकायदा गर्दी जमवून आरडाओरड करून कार्यालयाची प्रतिमा मलिन केली सदरचा प्रकार थांबवावा अन्यथा शासकीय निवडणुकीच्या कामात आपण बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून शासकीय कामात निवडणूक कामात अडथळा आणत आहात. त्याबद्दल फौजदारी कारवाई करण्याचे पत्र संबंधित गोंधळ घालणाऱ्या दगाजी भाईदास पाटील व पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना दिले आहे. यावर संबंधित दगाजी पाटील यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *