शैक्षणिक परिसरात फिरणाऱ्या सात टवाळखोरांची पोलिसांकडून धुलाई

पोलिसांनी रोड रोमि्यांना कायदेशिर तंबी देऊन सोडले   

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळा, महाविद्यालयात परिसरात टवाळखोर करणाऱ्या सात रोडरोमीयोंची पोलिसांनी चांगलीच धुलाई करीत त्यांच्यावर कारवाई केली. यात शहरासह ग्रामीण भागातील तरुणांचा समावेश आहे. त्यांना पोलिसांनी चांगलीच तंबी देत नंतर सोडून दिले. या कारवाईमुळे टळावखोरांना चांगलाच वचक बसणार आहे. 

शहरातील शाळा, महाविद्यालया नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये व  शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी टवाळखोर आणि रोडरोमिओ प्रतिबंध असावा या करीता अमळनेर पोलीस स्टेशनचे वेगवेगळे पथक नियुक्त केले आहे. हे पथक नियमित शाळा, महाविद्यालये यांना भेटी देऊन परिसरात गस्त करीत आहे. शुक्रवारी पथक गस्त करीत असताना ७ टवाळखोर शाळा, महाविद्यालय परिसरात काही एक शैक्षणिक उद्देश नसताना फिरत असताना मिळून आले. त्यांना योग्य ती कायदेशीर समज देऊन सोडून देण्यात आले.  तसेच कुणीही टवाळखोर यापुढे शैक्षणिक परिसरात विना शैक्षणिक उद्देश मिळून आल्यास तात्काळ अमळनेर पोलिस स्टेशनची संपर्क करण्याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आवाहन केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांच्या सूचना व आदेशाप्रमाणे तसेच पोलीस निरीक्षक  दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाने पोलीस अंमलदार अमोल पाटील, प्रशांत पाटील, गणेश पाटील नितीन कापडणे, जितेंद्र निकुंभें यांच्या पथकाने केली आहे.

 

या टवाळखोरांवर केली कारवाई

 

 रोड रोमियो व टवाळखोर मुलांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम कलम ११२,११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच या टवाळखोर मुलांना ताकीद देऊन सोडण्यात आले आहे.

पोलिसांशी संर्पक साधावा   

 

अमळनेर शहरातील नागरिकांनी महिलांसह शाळा, महाविद्यालयाच्या मुलींबाबत काही अडचणी, तक्रारी असल्यास पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा. संपर्क करणाऱ्यांचे नावे गुपित ठेवण्यात येतील.

दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक अमळनेर

रवि ज्वेलर्स अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1110/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *